Type Here to Get Search Results !

शाळेत होणाऱ्या सण उत्सवा मधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन विविधतेत एकतेचा मूलमंत्र जपावा- रणजीत भैय्या आडसकर शारदा इंग्लिश स्कूल केज येथे केरळचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी साजरा केला ओनम सण उत्सव.

 शाळेत होणाऱ्या सण उत्सवा मधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन विविधतेत एकतेचा मूलमंत्र जपावा- रणजीत भैय्या आडसकर 

शारदा इंग्लिश स्कूल केज येथे केरळचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी साजरा केला ओनम सण उत्सव.

  


केज/प्रतिनिधी


शारदा इंग्लिश स्कूल केज शहरातील इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा म्हणून ओळखली  जाते.सीबीएसई बोर्डाची अधिकृत मान्यताअसलेली एकमेव शाळा असून या शाळेने प्रत्येक क्षेत्रात यशाचा आलेखउंचावलेला आहे.शाळेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात शाळेत अध्यापन करणारे अध्यापक विविध राज्यातील आहेत.केरळ कर्नाटक,मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश व इतर ठिकाण चे शिक्षक,शिक्षिका अध्यापन करण्यासाठी शाळेत मोठ्या प्रमाणावर आहेत.सदरील अध्यापक हे आपआपल्या राज्या तील काही महत्वपूर्ण सण उत्सव ही शाळेतल्या विद्यार्थ्या समवेत अतिशय उत्साहाने साजरे करत असतात.केरळ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा ओनम हा सण उत्सव दि.६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या दरम्यान साजरा केला जातो.शाळे मध्ये केरळ राज्यातील शिक्षक व शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रतिवर्षी ओनम सणाचा उत्सव शाळेत साजरा केलाजातो.यावर्षी शाळेचे उपप्राचार्य सुरज सनी यांच्या प्रमुख मार्ग दर्शनाखाली हा उत्सव  साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे युवा मार्गदर्शक रणजीत भैय्या आडसकर,शाळेचे प्राचार्य मिश्रा एस.एम.,मार्गदर्शक देशमुख पी.एम.यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी रणजीत आडसकर यांनी मार्गदर्शन करताना ओनम हा सण केरळ राज्यातील नवीन वर्षाचे स्वागत करणाराअसून असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विविध पौराणिक कथा ओनम सण उत्सवा वर आधारित असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यातील साजरे होणाऱ्या सण उत्सवातून चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकाराव्या असे मत मांडले.शाळेचे प्राचार्य मिश्रा एस.एम. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ओनम सणाचे महत्व विद्यार्थ्यां समोर विशद केले. उप प्राचार्य सूरज सनी यांनी केरळची संस्कृती वविविध उत्सव याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला केरळच्या शिक्षिका व शाळेच्या विद्यार्थिनी यांनी यावेळी केरळी संस्कृतीवर आधारित नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचा समारोप क्रीडा शिक्षिका वर्षा दिख्खत यांनी केला. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका,पालक वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments