Type Here to Get Search Results !

आर्यन वाव्हळ यांना रसायनशास्त्रात पीएचडी पदवी प्रदान

 आर्यन वाव्हळ यांना रसायनशास्त्रात पीएचडी पदवी प्रदान



.


धारुर/प्रतिनिधी 


असोला ता.धारूर जि. बीड येथील भुमीपुञ आर्यन अनुरथ वाव्हळ यांना नुकतीच पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेमध्ये (एनसीएल) तसेच वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी(एसीएसइआर) अंतर्गत पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.आर्यन वाव्हळ यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उल्लेखनीय असून त्यांनी सेट,नेट जीआरएफ आणि गेट या प्रमुख परीक्षांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.सध्या ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून मुंबईत कार्यरत आहेत.आर्यन वाव्हळ यांनी शास्त्रज्ञ डॉ. आशा एस.के.यांच्या मार्ग दर्शनाखाली “बॅच अँड कंटिन्यूस फ्लो सिंथेसिस ऑफ रायलीनबीसइमाइड पॉलिमर्स अँड देयर एप्लिकेशन इन एनर्जी स्टोरेज” या विषयावर शोधप्रबंध सादर केला.या संशोधनामध्ये त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने पॉलिमर्स विकसित केले असून या पॉलिमर्सचा उपयोग सूपर कॕपैसिटर ऊर्जा स्टोरेजमध्ये प्रभावी वापर केला आहे.त्यांनी तयार केलेल्या मटेरियलचे व्यावहारिक उपकरण पातळीवर प्रात्यक्षिक सादर करून नव्या तंत्रज्ञानाची प्रभावीता दर्शवली.आर्यन वाव्हळ यांचे संशोधन कार्य जागतिक स्तरावरील प्रमुख शोधनिबंध प्रकाशनांमध्ये जसे की, अमेरिकन केमिकल सोसायटी (एसीएस) आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी) प्रसारित झाले आहे.त्यांच्या कार्या साठी एसपीएसई-मैक्रो कॉन्फरन्समध्ये त्यांना सर्वोत्तम सादरीकरणा साठी प्रथम पारितोषिक मिळाले.ज्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.वैज्ञानिक संशोधन क्षेत्रामध्ये आर्यन वाव्हळ यांच्या संशोधनाचे विशेष कौतुक होत आहे. रासायनिक प्रयोगशाळे तील शास्त्रज्ञांनी त्यांचे कार्य पाहून त्यांनाशुभेच्छा दिल्या आहेत.डॉ.आर्यन वाव्हळ यांनी त्यांच्या मार्गदर्शक डॉ.आशा एस. के.यांचे विशेष आभार मानले आहेत.त्यांनीत्यांचा शोधप्रबंध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलाअसून, याबद्दल त्यांची विशेष प्रशंसा होत आहे.आर्यन वाव्हळ यांनी त्यांचे आई -वडील आणि कुटुंबीयां नाही हा शोधप्रबंध समर्पित केला आहे. त्यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याचे राष्ट्रीय स्तरावर नाव उंचावले आहे आणि त्यांच्या कार्यामुळे युवा संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

Post a Comment

0 Comments