Type Here to Get Search Results !

मांगवडगाव येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनाशिक्षणविस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी विविध विषयावर केले मार्गदर्शन.

 मांगवडगाव येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनाशिक्षणविस्तार अधिकारी सुनील केंद्रे  यांनी विविध विषयावर केले मार्गदर्शन.


  

 केज/प्रतिनिधी


दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी केज तालुक्यातील मांगवडगाव येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय या शाळेला गट शिक्षणाधिकारी कार्यालय केज येथील शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी भेट दिली.या भेटी दरम्यान त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, काॅपीमुक्त,भयमुक्त परीक्षा  देणे भविष्यासाठी कसे फायद्याचे आहे याचे महत्त्व विशद केले.तसेच इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना गणित,विज्ञान या विषयातील सुत्रे सांगुन भाषा व सामाजिक शास्त्रे या विषयातीलअभ्यासपूर्ण बाबींवर प्रकाशझोतटाकुन विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थीही उंच झेप घेऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण केला.तसेच या प्रसंगी शाळेतील पायाभूत सुविधा,पायाभूत चाचणी परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याविषयी मार्गदर्शन केले.तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या बाबी व स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. शाळेचा निसर्गरम्य परिसर,परसबाग, शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त व शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments