Type Here to Get Search Results !

बनसारोळा येथील सरपंच अजित गोरे यांना पदावरुन कमी करण्यात यावे- नागरिकांची मागणी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला सरपंचा कडून केराची टोपली. - गुणवंत धायगुडे ग्रामपंचायत कार्यालया समोर ग्रामस्थाचे आमरण उपोषण सुरु

 बनसारोळा येथील सरपंच अजित गोरे यांना पदावरुन कमी करण्यात यावे- नागरिकांची मागणी

गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला सरपंचा कडून केराची टोपली. - गुणवंत धायगुडे

ग्रामपंचायत कार्यालया समोर ग्रामस्थाचे आमरण उपोषण सुरु


.


केज/प्रतिनिधी


 केज तालुक्यातील बनसारोळा येथील सरपंच अजित गोरे यांना पदा वरून कमी करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे येथील नागरिकांनी व उपोषण कर्त्यांनी केली आहे.गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला सरपंचाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे असा आरोप गुणवंत उर्फ राजाभाऊ धायगुडे यांनी केला आहे.ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाभार्थ्या सह नागरिक आमरण उपोषणास बसले आहेत. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील बनसारोळा येथील ग्रामपंचायतचे सरपंच अजित हनुमंत गोरे यांनी जाणून-बुजून यशवंतराव चव्हाण व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजने पासून गावातील लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे.दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी गटविकास अधिकारी केज यांना ग्रामपंचायतचे सदस्य जयचंद विनायक धायगुडे यांनी लेखी अर्ज दिला होता.सदर अर्जात जयचंद धायगुडे यांनी म्हटले होते की,सदर योजनेच्या लाभार्थ्यांची बनसारोळा येथील अंदाजे लोकसंख्या दोन हजाराच्या जवळपास  असून सरपंच अजित गोरे हे या समाजावर जाणीव पूर्वक अन्याय करत आहेत.सरपंच अजित गोरे यांनी त्यांच्या बनसारोळा या गावातील व्हाट्सअप ग्रुप बनसारोळानवनिर्माण या ग्रुपवर स्वतः ते एडमिन असलेल्या ग्रुप वर दिनांक १ फेब्रुवारी २०२४ ला मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे जीआर ग्रुप वर टाकले असून नंतर गावातील यशवंतराव चव्हाण व अहिल्यादेवी होळकर योजनेचे लाभार्थी ग्राम पंचायत कार्यालयाकडे प्रस्ताव घेऊन गेले असता सरपंच अजित गोरे यांनी सदर प्रस्तावावर सह्या करण्यास नकार दिला. तसेच वरिष्ठ कार्यालयाचे पत्र घेऊन या असे लाभार्थी यांना सांगितले. त्यावरून सदर योजने विषयी लाभार्थ्यांनीसरपंच यांना विचारणा केली. असता सरपंचांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असे सदर नमूद तक्रारीत जयचंद धायगुडे यांनी म्हटले आहे.सदरतक्रारीची दखल घेत गट विकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी लेखी आदेश काढून कळवले होते की, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालय बीड यांचे पत्र दिनांक ५ जानेवारी २०२४आपणास यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजनेचे व पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे ठराव प्रस्ताव सादर करण्यासाठी दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम तारीख सहाय्यक संचालक यांनी दिलेली आहे.परंतु आपण अद्याप ही या कार्यालयास ठरावा सह प्रस्ताव सादर केलेले नाहीत आपण ग्रामसभा ठराव घेण्यास टाळाटाळ करत आहात असे तक्रार दारांनी लेखी स्वरूपात या कार्यालयास कळविले आहे व आपण वरिष्ठ कार्यालयाचे पत्र घेऊन या असे सांगत आहात हे खरे आहे काय असे असल्यास आपण पात्रलाभधारकांना लाभापासून वंचित ठेवत आहात असे समजून येते ही बाब खूप गंभीर आहे आपण ठरावासह प्रस्ताव दिनांक १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत या कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावेत त्यानंतर होणाऱ्या निलंबनाची जबाबदारी आपणावर राहील याची गंभीर नोंद घ्यावी लेखी पञाद्वारे आदेश  सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना गटविकासअधिकारी पंचायत समिती कार्यालय केज यांनी दिले होते.परंतु सदर प्रकरणे आदेशदेऊन ही सरपंच यांनी कसल्याच प्रकारची सदर प्रकरणी कारवाई केली नाही. म्हणून दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी उप जिल्हाधिकारी अंबेजोगाई मुख्य कार्यकारीअधिकारी जिल्हा परिषद बीड, तहसीलदार केज गट विकास अधिकारी केज खासदार बजरंग सोनवणे यांना सदर प्रकरणी लेखी निवेदन दिले होते.सदर तक्रारी मध्ये सरपंच अजित गोरे यांना पदा वरून तात्काळ कमी करण्यात यावे व गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला सरपंचाकडून केराची टोपली देण्यात आली आहे असे देखील नमूद करण्यात आले होते परंतु सदर निवेदन देऊन ही कारवाई केली नाही म्हणून उपजिल्हाधिकारी आंबेजोगाई यांच्याकडे तक्रारी अर्ज करून सदर प्रकरणीखुलासा मागितला परंतु त्यावरही काही कारवाई करण्यात आली नाही म्हणून दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना पत्र देऊन सदर प्रकरणी योग्य ती संबंधितावर कारवाई करून सदरलाभधारकांना सदर योजना देण्यात यावे अन्यथा दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यातआला होता.अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात तक्रार करून व संबंधित कार्यालयास प्रत्यक्षात भेटूनही न्याय मिळत नाही म्हणून उप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या इशारा याप्रमाणे गुणवंत उर्फ राजाभाऊ धायगुडे व बब्रुवान बळीराम नवगण हे दोघेजण आमरण उपोषणास बसले आहेत व त्यांना ग्रामस्थांनी व इतर लाभार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच सरपंच अजित गोरे यांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दिली आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे पुढे बोलताना उपोषण करते म्हणाले की,एनटी समाजासाठी १७२ लाभार्थी व यशवंतराव चव्हाण या योजनेतून २७ लाभार्थी एकूण १९९ लाभार्थी सदर लाभापासून वंचित राहिले आहेत.तसेच सरपंच अजित गोरे यांनातात्काळ पदावरून कमी करण्यात यावे व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील त्यांनीमागणी केली आहे. 

सरपंच अजित हनुमंत गोरे यांच्या मोबाईल दूरध्वनी क्र.८८५६०७७१५८ या नंबरवर आमच्या प्रतीनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीचा फोन घेतला नाही. 

ग्राम विकास अधिकारी देशमुख साहेब यांच्या मोबाईल दूरध्वनी क्र. ८९७५३३११९९ या नंबर वर आमच्या प्रतिनिधींनी फोन केला असता आमच्या प्रतिनिधीचा त्यांनी फोन घेतला नाही. 

गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने काळे यांच्या दूरध्वनी क्र. ९५०३०७९९८८ या क्रमांकावर आमच्या प्रतिनिधींनी फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधींचा फोन घेतला नाही.

Post a Comment

0 Comments