Type Here to Get Search Results !

केज शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा डाॕ.ञिंबक चाटे यांच्या बैलपोळ्याचे केज वासियांना आकर्षण.

 केज शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा डाॕ.ञिंबक चाटे यांच्या बैलपोळ्याचे केज वासियांना आकर्षण.



केज शहरासह तालुक्यात बैळपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढ वद्य आमावस्या या दिवशी बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.या दिवशी सकाळी बैलांना व ईतर पशुधनाला राळेभात व गुळवणी चा आहार दिला जातो.नंतर शिंगाना विवीध रंग लावुन बैलांना सजवुन त्यांची मिरवणूक काढली जाते.केज शहरा तील सुप्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ तथा भारतीय नरेंद्र मोदी संघाचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ञिंबक चाटे हे आपली  ओपीडी पोळ्याच्या दिवशी बंद ठेवून पुर्ण दिवस बैलपोळा सण उत्साहात साजरा करतात. त्यांच्या बैलपोळ्यासाठी सर्वांना नवीन कपडे,फेटे, ढोलबाजा सह फटाक्याची आतिशबाजी करतबैलांना राहत्या घरी आणुन विधीवत पुजा करुन त्यांचे  लग्न लावले जाते.व पुरण पोळीचा नैवेद्य दाखवुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त  केली जाते.नंतर सर्वाना पुरणपोळीचे जेवण देऊन सण पुर्ण होतो.पशुधन कमी झालेले असताना सुद्धा आपली संस्कृती टिकावी व नवीन पिढीला बैलपोळा सणाचे महत्त्व कळायला हवे म्हणून वयोवृद्ध असतानाही उत्साहात डाॕ. ञिंबक चाटे      हा सण साजरा करतात त्यांच्या बैलपोळ्याचे केज वासियांना विशेषआकर्षण असते.केज शहरातील नागरीक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन मुलांना हा सण दाखवतात.

Post a Comment

0 Comments