Type Here to Get Search Results !

केज सार्वजनिकबांधकाम उपविभागाच्या ध्वजारोहणाला अधिकारीच गैरहजर.

 केज सार्वजनिकबांधकाम  उपविभागाच्या ध्वजारोहणाला अधिकारीच गैरहजर.


केज/प्रतिनिधी 


केज येथील सार्वजनिक  बांधकाम उपविभागीय कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी आयोजित  करण्यात आलेल्या ध्वजारोहण सोहळ्याला उपविभागीय अभियंता युवराज मळेकर गैरहजर होते.या ठीकाणी ध्वजारोहन करताना ध्वज जमिनीवरचफडकविण्यात आला.त्याच वेळी उपस्थीतांनी टाळ्याही  वाजविल्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असुन याप्रकरणी  चौकशी करुनदोषीविरूद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे तालुका उपाध्यक्ष  मालोजी नाना गलांडे यांनी मुख्यमंत्री,पालक मंत्री,मुख्यअभियंता, अधिक्षक अभियंता व तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात युवराज मळेकर हे उपविभागीय  अभियंता म्हणुन कार्यरत आहेत.त्यांच्यासह एकही शाखा अभियंता कधीही कार्यालयात हजर रहात नाहीत.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहनालाही उपविभागीय अभियंता युवराज मळेकर हजर नव्हते.ते पुणे येथे राहूनच केज येथील कार्यालयाचा कारभारकरतात.आमदार, खासदारांशिवाय तेइतरांचे  फोन ही घेतनाहीत.त्यांच्या  काळात रस्ते व इमारतीचे झालेली कामे हे निकृष्ट  दर्जाचे झाले आहेत.असा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,पालक मंत्री, मुख्य अभियंता,अधिक्षक  अभियंता व तहसिलदार यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments