Type Here to Get Search Results !

साबला ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री युवादुत यांचा सत्कार सोहळा संपन्न .


 साबला ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री युवादुत यांचा सत्कार सोहळा संपन्न .


केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील मौजे साबला येथील ग्राम पंचायत कार्यालयात  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.सरपंच,उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वामी रामानंद तीर्थ,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचेपूजन करण्यात आले.यानंतर ध्वजारोहन कार्यक्रम करण्यात आला.आणि नंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री युवा दुत यांचा सत्कार कार्यक्रम ग्राम पंचायत कार्यालय साबला यांच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. जनाबाई नरहरी काकडे, प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी श्री. धनराज सोनवणे,उप सरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे,ग्रामपंचायत सदस्यश्री.ज्ञानेश्वरपांचाळ, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती प्रतिभा पोपट काकडे यांच्या हस्ते श्री. पवन लक्ष्मणराव काकडे मुख्यमंत्री युवा दुत,ग्राम पंचायतकार्यालय,साबला कु.वैष्णवी जालींदर मुळे मुख्यमंत्री योजना आयोजक दुत,श्री. कृष्णकांत अरूणराव काकडे मुख्यमंत्री युवा दुत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कटारे वस्ती साबला,कु.सुशांता समाधान खरात मुख्यमंत्री युवा दुत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,साबला  कु.अश्विनी उत्तमराव सरवदे जिल्हा परिषद प्राथमिकशाळा,आनंद वाडी साबला या वरील सर्व नवनिर्वाचितमुख्यमंत्री युवा दुत यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय साबला यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सर्व मुख्यमंत्री युवा दुत यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण बन्सी काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. उमाशंकर साहेबराव शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments