Type Here to Get Search Results !

रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप तिसऱ्या डीपीआर मध्ये ३ हजार घरकुलांचा टप्पा पूर्ण करणार- नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच एक लाख रुपये होणार जमा

 रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप

तिसऱ्या डीपीआर मध्ये ३ हजार घरकुलांचा टप्पा पूर्ण करणार- नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड

लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच एक लाख रुपये होणार जमा





केज/प्रतिनिधी


दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी केज नगरपंचायत कार्यालयात रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या पात्र लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे तसेच

तिसऱ्या डीपीआर मध्ये ३ हजार घरकुलांचा टप्पा पूर्ण करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड  यांनी बोलताना म्हटले आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड  तर प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेवक जलालभाई इनामदार,गटनेते भाऊसाहेब गुंड, नगरसेवक बाळासाहेब गाडवे, नगरसेवक कलीमभाई सय्यद, नगरसेवक  अरुण अण्णा गुंड, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव हजारे, किसन दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर  १ लाख रुपये जमा करणार आहोत पाठीमागील काळामध्ये ज्या लाभार्थ्यांना एक लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत अशा लाभार्थ्यांनी तात्काळ कामे चालू करावीत म्हणजे त्यांना दुसराही हप्ता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल जो लाभार्थी काम चालू करणार नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाहीत. शासनाच्या नियमा अनुसार प्रत्येक लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे काम करावे लागेल. 

तसेच प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांच्या वार्डातील नगरसेवकाची संपर्क साधून कागदपत्राची पूर्तता करावी त्याचबरोबर कुठला लाभार्थी हा गरीब अथवा जवळचा किंवा विरोधक असा भेदभाव केला जाणार नाही त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यावर आम्ही अन्याय करणार नाहीत प्रत्येक लाभार्थ्यांना नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा केले जातील त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांनी कसल्याही आमिषेला बळी पडू नये असे बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सौ. बनसोड म्हणाले की, तिसऱ्या डीपीआर मध्ये केज शहरात ३ हजार घरकुलांचा टप्पा आम्ही आमचे नेते हरून भाई इनामदार यांच्या व आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार आहोत. 

यावेळी केज नगरपंचायत चे नगरसेवक व कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments