Type Here to Get Search Results !

तलावातून रस्ता काढत नागरिकांचा जीवघेणा प्रवास लोकप्रतिनिधींनो संकटकाळीतरी जनतेच्या हाकेला धावून या अन्यथा येणाऱ्या काळात त्याचा हिशोब चुकता करू-मिनाज पठाण

 तलावातून रस्ता काढत नागरिकांचा जीवघेणा प्रवास

लोकप्रतिनिधींनो संकटकाळीतरी जनतेच्या हाकेला धावून या अन्यथा येणाऱ्या काळात त्याचा हिशोब  चुकता करू-मिनाज पठाण



केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील सोनिजवळा येथील भवानी वस्ती ते ढाकेफळ रस्त्यावर दोन तलाव आहेत या तलावातुन रस्ता असल्याने येथील नागरिकांना प्रत्येक वर्षी याच पाण्यातुन रस्ता शोधत जावे लागत आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असेकी,केजतालुक्यातील सोनिजवळा येथीलभवानी वस्ती ते ढाकेफळरस्त्याची दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावर अनेक घरे आहेत.या रस्त्यावरून शाळकरी मुलांना ये-जा करावी लागत आहे.सर्व जातीधर्माचे लोक या रस्त्याच्या आपआपल्या शेतात घरे बांधून रहात आहेत.अनेक वेळा तोंडी लोकप्रतिनिधींना सांगितले परंतु आज पर्यंत कोणीही या कडे डोकावून देखील पाहिले नाही मग आम्ही माणसं नाहीत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत जाणारे लहान मुले असतील किंवा वयोवृद्ध व्यक्तींना जर रात्री बेरात्री काही अडचण आल्यास या रस्त्यावरून कसा प्रवास करायचा? पर्यायी रस्ता नाही ही सर्व माहिती  आमदार पती,आमदार सासरे,सरपंच,ग्रामसेवक, खासदार यांना वाॅटसअप द्वारे माहीती दिली परंतु कांहींनी बघुन ओके तर काहींनी तर बघीतलेच नाही.जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे कुठे बसले?का फक्त निवडणुकीतआश्वासनांची खैरात वाटायची आणि जनतेला वेड्यातकाढायचे आणि मोकळे व्हायचे, असले धंदे बंद करा. जनतेचे काम होत असेल तर करा नाहीतर खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करु नका. निवडणुकीत खोटी आश्वासने देताना जरा सुध्दा वाटले पाहिजे कि आपण याच मायबाप जनतेच्या जिवावरनिवडुन येतो आणि पुन्हा यांच्या कडे डुंकुनही पहात नाहीत जनाची नाही पण मनाची तरी थोडी या लोकप्रतिनिधींनी ठेवून जनतेचे काम करावे. निवडणुकीत हेच आमची मायबाप जनता म्हणायचे परंतु हिच जनता मेली का जिवंत आहे हे पाच वर्षे बघायचे नाही हेच का तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे  आम्ही सुद्धा माणसेच आहोत आमचा रस्ता दुरुस्त करता आला नाही तर पर्यायी रस्ता तरी आम्हाला करुन द्यावा अशी येथील नागरीक करत आहेत 

१) भवानी वस्ती ते ढाकेफळ रस्त्यावर दोन तलाव आहेत या तलावा तुन रस्ता असल्याने दुसरा पर्यायी रस्ता नाही,आमचे लहान मुले याच रस्त्या वरून शाळेला ये-जा करावे लागत आहे, वयोवृद्ध व्यक्तींना दवाखाना व दळणवळणा साठी याच रस्त्यावरून जावे लागत आहे. खासदार,आमदार,सरपंच,ग्रामसेवक यांना फोटो टाकुन माहिती‌ दिली परंतु एकाही लोकप्रतिनिधींनी उत्तर दिले नाही. तहसिलदार यांना फोन करून माहीती दिली तर थोड्या वेळाने सांगतो साहेबांचा अजुन थोडावेळ झाला नाही साहेब नेते हो माणुस मेल्यावर त्यांना सांत्वनपर भेट देऊनफोटो शेअर करण्यापेक्षा जिवंत माणसाला मदत करा .

भवानी वस्ती ते ढाकेफळ रस्त्यावरील रहीवाशी सोनिजवळा भवानी वस्ती ते ढाकेफळ रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे येथील नागरिकांना दळणवळण व शाळेतील मुलांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याची वेळीच दखल लोकप्रतिनिधी घेतलीनाही तर वार्ड क्रमांक दोनचे ग्रामपंचायत सदस्य  या नात्याने तिव्र आंदोलन 

छेडणार असल्याचा ईशारा मिनाज पठाण यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments