Type Here to Get Search Results !

मांजरा धरणाचे जलपूजन राहुल खोडसे यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न

 मांजरा धरणाचे जलपूजन राहुल खोडसे यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न




केज/प्रतिनिधी


 केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाचे जलपूजन राहुल खोडसे यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न झाले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,यावर्षी पाऊस हा सुरुवातीच्या काळात चांगला झाला परंतु मध्यंतरी पावसाने दडी मारली होती त्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासेल असे शेतकरी बांधवांना वाटत होते. परंतु  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

मागील दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात सर्व दूर पाऊस पडत असल्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. 

गेल्या दोन दिवसापासून धरणाचे दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडले आहे. 

तसेच बीड,लातूर,धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये मांजरा धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यास व शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी उपयोगी आहे. गुरुवारी सकाळी ठीक१०-०० वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते राहुल खोडसे यांनी परिसरातील शेतकरी बांधवांना एकत्रित करत सर्वांना सोबत घेऊन मांजरा धरणाची विधीवंत जलपूजा केली. 

यावेळी बोलताना राहुल खोडसे म्हणाले की, बीड  व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन देखील अशी परिस्थिती झाली होती ती म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली होती.ही परिस्थिती काही लोकप्रतिनिधीमुळे झाली होती परंतु यापुढे तसे होणार नाही सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी पाणी वापरायला मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू व आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या हक्काचे पाणी आपल्यालाच वापरायला मिळाले पाहिजे यासाठी सर्व जण मिळून प्रयत्न करू असे उपस्थित  शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना खोडसे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना खोडसे म्हणाले की, यापुढेही कुठलेही राजकीय लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन जलपूजन न करता सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊनच जलपुजनाचा कार्यक्रम घेऊ असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. 

यावेळी राहुल खोडसे,गोविंद सोमवंशी,शशिकांत खोडसे,शंकर गुजर, विजय जाधव, शशिकिरण धागे, हनुमंत खोडसे, नितीन गुजर,यासीन शेख, पांडुरंग सोमवंशी, मनोज गुजर, गणेश गुजर, विशाल खोडसे, आतिश खोडसे, सचिन गुजर, सोमनाथ गुजर, बाबा गुजर,उमेश गुजर, यश सोमवंशी, सोपान खोडसे यांच्यासह मांजरा धरणाचे शाखाधिकारी निकम साहेब,ठोंबरे साहेब,कर्मचारी व पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments