Type Here to Get Search Results !

अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने बीड शहरात खळबळ, घातपात की आत्महत्या चर्चेला आले उधाण

 अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने बीड शहरात खळबळ,

घातपात की आत्महत्या चर्चेला आले उधाण


.


बीड /प्रतिनिधी 



बीड जिल्ह्यात दोन दिवसा पासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे, नदी,तलाव ओसंडून वाहत आहेत.दिनांक ३१

ऑगस्ट २०२४ रोजी रात्री सुरु झालेला मध्यमपाऊस दिवसभरपडल्यानेरविवारी बीड शहराजवळील बिंदुसरा तलाव टक्के भरला असल्याने पूर परिस्थिती निर्माणझाली. अंकुशनगर भागातील कर्परा नदी देखील ओसंडून वाहत आहे. 

दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९-०० वाजण्याच्या सुमारास या भागातील नागरिक कर्परा नदीकडे पाणी पाहण्या साठी गेले असता त्यांना पाण्यात एक पुरुष जातीचा मृतदेह वाहून आलेला दिसल्याने तात्काळ नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला व मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.सदर मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढीलतपास बीड पोलीस हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments