Type Here to Get Search Results !

केज येथील सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा.

 केज येथील सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा.



केज/प्रतिनिधी


हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस संबंध भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.केजयेथील सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.बी.पाटील हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. वैशाली आहेर याउपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ.रमेश माने यांनी केले तर सुत्र संचालन व आभार डॉ. मधुकर चाटे यांनी मानले. 

कार्यक्रमास महाविद्यालया तील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments