Type Here to Get Search Results !

लहुजी क्रांती मोर्चा,श्रेया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे सर यांचा स्तुत्य उपक्रम.

 लहुजी क्रांती मोर्चा,श्रेया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे सर यांचा स्तुत्य उपक्रम.



केज/प्रतिनिधी


लहुजी क्रांती मोर्चा,श्रेया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह केज येथे दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी केज व अंबाजोगाई परिसरातील मातंगसमाजा तील एम.बी.बी.एस प्रथम वर्षे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजितकरण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षण तज्ञ बळीराम जोगदंड,प्रमुख पाहुणे वैजनाथ मोरे,डॉ.वैजनाथ क्षिरसागर,डि.के.जाधव नाना,शहाजी जाधव, बबनराव लांडगे मंडळ अधिकारी,विलासकाळुंखे प्रहार जिल्हाध्यक्ष बीड  यांचे प्रमुख उपस्थिती होती.अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.म्हणुन कार्यक्रमाचे मुख्यआयोजकसामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे सर व बाबुराव गालफाडे यांनी शाल,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन केलेले विद्यार्थी कु.साक्षी किशोर मोरे, चि.प्रतीक बळीराम जोगदंड,चि.ऋषिकेश विलास लोंढे,चि.वेदांत लक्ष्मण थोरात या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. 

तसेच यावेळी बळीराम जोगदंड सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून सखोल असे मार्गदर्शन केले व मोरेयांनी  पालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी दुनघव,रवींद्र बाबर,सचिन गालफाडे,जालिंदर मुजमुले,किशोर मोरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी पालक उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे यांनी स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments