Type Here to Get Search Results !

लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण.

 लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण.



केज/प्रतिनिधी


केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपककामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके यांची निवड झालेलीआहे. आदर्श शेतकरी धर्मराज थोरात यांची शेती क्षेत्रा तील उल्लेखनीय कार्या बद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गरड मंगल कार्यालय किल्लेधारूर येथे होणार आहे.या पुरस्काराचे वितरण रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.स्वरुपसिंह हजारी,शेषेराव फावडे, अर्जुन गायकवाड,सुमंत राव डुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती चेअरमन सुरेश शिनगारे,व्हाईस चेअरमन प्रा.सुरेशकांबळे,  संचालक प्राचार्य डॉ.माधवराव फावडे, सचिव बालासाहेब घुगे, खजिनदार दत्तु यादव व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments