Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न.

 वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न.



बीड/प्रतिनिधी


वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न झाला आहे.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्या आहेत.यामध्ये बीड जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष म्हणून अजय सरवदे यांची निवड झाली असून त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या आहेत.वंचित बहुजन बीड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजयसरवदे, महासचिव बंडु जाधव, उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सल्लागार बबन वडमारे, विष्णू देवकते,अरुण जोजाळ यांच्यासह इतर कार्यकारणी जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी सर्व ज्येष्ठ व आजी माजी  पदाधिकारी,कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीची जनसामान्य पर्यंत पोहोचून पक्ष संघटना उभारणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सल्लागार विष्णु देवकते, देवा गव्हाणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments