Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचा पालक मेळावा संपन्न,पालकांचा उत्स्फुर्त सहभाग.

 राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचा पालक मेळावा संपन्न,पालकांचा उत्स्फुर्त सहभाग.



केज/प्रतिनिधी


केज शहरातील राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत पालक मेळावा घेण्यात आला.या वर्षातील हा पहिला पालक मेळावा होता.यावेळी विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक विषयांवर संवाद साधण्यात आला.शाळा, पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रगतीचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते  प्रा.हनुमंत भोसले यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव बेडसकर तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.राजेसाहेब देशमुख (पापा),उपाध्यक्ष अंकुशराव इंगळे,संस्थेचे सचिव जी.बी.गदळे, संचालक वासुदेवराव डोंगरे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.बी.चाटे यांचीउपस्थिती होती.यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने पालक मेळाव्याचीसुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक जी.बी.गदळे यांनी केले.यावेळी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करुन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी पालक व शिक्षक यांना मोलाच्या सुचना केल्या.गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी पालकांना अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ठरवले तर कोणत्याही खाजगी शिकवणी शिवाय विद्यार्थी उत्तम यश मिळवुशकतात. स्वयंप्रेरणेने अभ्यास केला तर आपले ध्येय आपण गाठु शकु असे प्रतिपादन  लक्ष्मणराव बेडसकर यांनी केले.अध्यक्षीय समारोपा वेळी बोलताना प्रा. हनुमंत भोसले यांनी शाळा, शिक्षक व पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाऊ शकते.विद्यार्थ्याचा कल व बुद्धिमत्ता पाहूनपालकांनी अपेक्षा ठेवली पाहिजेअसे प्रतिपादन केले.यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापक श्रीराम चाटे सर,दिलीप बनसोडे,राहुल माने,बोधने मॅडम यांनी शाळा व विद्यार्थी या विषयी मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित इतर पालकांनीही आपले विचार मांडले.यावेळी शाळेतून दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा पालकांचा सुर दिसुन आला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन डिरंगे जी.बी. यांनी केले तर आभार अनिता पवार यांनीमानले. पालक मेळाव्यात माता पालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व्हि.बी. यादव,ए.डी.देशमुख,आर.एस.क्षीरसागर,जे.आर. मस्के यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments