Type Here to Get Search Results !

केज येथील वक्रतुंड गणेश मंडळाचे विविध उपक्रम दहा दिवस चालणार, रामायणाचार्य ह.भ.प. बाळासाहेब गेंदले महाराज यांच्या तुलसी रामायण कथेचे आयोजन

 केज येथील वक्रतुंड गणेश मंडळाचे विविध उपक्रम दहा दिवस चालणार, 

रामायणाचार्य ह.भ.प. बाळासाहेब गेंदले महाराज यांच्या तुलसी रामायण कथेचे आयोजन 



केज/प्रतिनिधी  


वक्रतुंड गणेश मंडळाचे हे १६ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.यामध्ये दररोज हरिपाठ,तुलसी रामायण कथा,रक्तदान शिबीर,दंत तपासणी,नेत्र तपासणी, भारूड,सुरसंगम संगीत भजन,मुलांची स्पर्धा  आयोजित केली आहे. 

वक्रतुंड गणेश मंडळाचे हे १६ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.दि.७ सप्टेंबर रोजी  गणेश स्थापना झाली असुन स्वररत्न रामायणाचार्य ह.भ.प. बाळासाहेब महाराज गेंदले यांच्या सुस्वरात तुलसी रामायण कथेचे आयोजन दि.८सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दररोज दुपारी २ ते ५ असणार आहे.दि. ८ सप्टेंबर रोजी ६ ते ७-३० लहान मुलांच्या स्पर्धा होतील.सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजीसायंकाळी ६ ते ७-३० महिलां करिता खेळ पैठणीचा असणार आहे.दि.१० सप्टेंबर रोजी  सकाळी १० ते १२यावेळी रक्तदान शिबीर होईल.दि. ११ सप्टेंबर रोजी १०ते १ यावेळी  त्र तपासणी आनंदरुषी नेत्रालयांचे डॉ. सुरवसे स्वस्तीकहॉस्पिटल  येथे असेल दि.१२ सप्टेंबर रोजी १० ते १ यावेळी दंत रोग तपासणी डॉ.गिते विठाई दंत क्लिनिक कानडी रोड येथे होईल. दि.१३ सप्टेंबर रोजी महिलांसाठी व मुलींसाठी महिला अत्याचार व गुड टच बॅड टच यावर प्रा. प्रशांत जनार्धन वाघमारे याचे सायंकाळी ८ ते १० व्याख्यान,दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते १० भारूड सम्राट बी.एम.फड मूर्तिकार परभणी यांच्या  भारूडाचा कार्यक्रम होईल.दि.१५ सप्टेंबररोजी सकाळी ११ ते १ ह.भ.प. बाळू महाराज उगले यांचे काल्याचे कीर्तन व महा प्रसाद तसेच दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते १० अनिल वैरागे यांचा सुरसंगम संगीत भजन तसेच दररोज सकाळी व सायंकाळी गणेश आरती होईल. संगीत तुलसी रामायण कथेला संगीतमय साथ दिनेश महाराज काळे, मनोहर महाराज थोरे, प्रसाद महाराज वैरागे, कृष्णा महाराज खरात, नारायण महाराज गिराम यांची राहील.सर्व कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments