Type Here to Get Search Results !

गावकऱ्यांच्या ऋणात कायम राहील. प्रा.शांतीनाथ बनसोडे अमृत महोत्सवानिमित्त शाळांना पुस्तके दिली भेट

 गावकऱ्यांच्या ऋणात कायम राहील. प्रा.शांतीनाथ बनसोडे

अमृत महोत्सवानिमित्त शाळांना पुस्तके दिली भेट



केज/प्रतिनिधी  


केज तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विभागाचे रजिस्ट्रार आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक म्हणून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असे काम पाहिले असे प्राध्यापक शांतिनाथ बनसोडे यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम मूळ कानडी माळी गावी संपन्न झाला.मेजर म्हणून नावाने सर्वपरिचित असलेले प्राध्यापक शांतिनाथ अण्णासाहेब बनसोडे हे आंबेजोगाई येथील यशवंतराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालया मधून प्राध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले.प्राध्यापक असताना त्यांनी एनसीसी चेही काम मोठ्या प्रमाणा वर केले.आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलांना एनसीसीचीआवड निर्माण केली.वाणिज्य शाखेत प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला.तसेच त्यांच्या अतिशय शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे काही काळ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रजिस्ट्रार म्हणून ही त्यांची नेमणूक करण्यात आली होती.त्याचबरोबर नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठामध्येही त्यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून भरीव काम केले,आणि कॉपीवर मोठ्याप्रमाणावर प्रतिबंध आणला.

प्रा.शांतिनाथ बनसोडे यांना ७५ वर्षे पूर्णझाल्याने कानडी माळी येथील गावकऱ्यांनी त्यांच्याअमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा.बनसोडे यांनी गावातील कानेश्वर विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळे तील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पुस्तके भेट दिली.आणि यापुढेही विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये काही अडचण निर्माण झाली तर सर्वतोपरी मदतीचे आश्वासन ही दिले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू मधुकर गायकवाड हे होते तर कार्यक्रमासाठीआयपीएस अधिकारी कमलेश मीना, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, वाचन चळवळीचे प्रेरक अभिजित जोंधळे, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, डॉ.दिनकर राऊत,केंद्र प्रमुख संजय चवरे, मुख्याध्यापक संतोष गरडे,श्री.सोनवणे,सरपंच अशोक राऊत,उपसरपंच बालासाहेब राऊत यांची उपस्थिती होती.                 कार्यक्रमासाठी गावातील जेष्ठ नागरिकांसह महिला आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थितीहोती. सूत्रसंचलन अरुण शिंदे यांनी तर आभार माजी मुख्याध्यापक राम राऊत यांनी केले.

Post a Comment

0 Comments