Type Here to Get Search Results !

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न.

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न.



केज/प्रतिनिधी 


साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येतअसलेल्या विविध योजनांची माहीती तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतरमागास बहुजन कल्याण विभाग बीड येथील निरीक्षक श्री. लक्ष्मण बारगजे यांनी विविध योजनांची माहीती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी ते म्हणाले की,इतर मागास बहुजन कल्याण विभाग राज्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय मेळावे घेऊन या विभागा मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना ह्या समाजातील तळागाळापर्यंत लोकां पर्यंत पोहचली पाहिजे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करत आहे.या विमागामार्फत १९५३ सालापासून निवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात.या विभागामार्फत चालणा-या ऊसतोड प्रवर्गातील साने गुरुजी निवासी विद्यालय हे राज्या तील आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी प्रथम निवासी शाळा आहे असे गौरवोदगार ही त्यांनी या प्रसंगी काढले.राज्या तील नामांकित इंग्रजी शाळात धनगरसमाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत व निवासी वसतीगृह चालवितात.अशा अनेक योजनांची त्यांनी शासन राबवित असलेल्या योजनांची माहीती देतांना सांगीतले की,महाज्योती च्या माध्यमातुन विद्यार्थांच्या शिक्षणासाठी

 प्रशिक्षण व अर्थसहाय्य योजना,इतरमागासवर्गीय महामंडळामार्फत विविध कर्ज योजना तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ,संत काशिबा गुरव यूवा आर्थिक विकास महामंडळ,जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ,संत सेना महाराज केश शिल्पी आर्थिक विकासमहामंडळ यासह ऊसतोड कामगारां च्या मुला-मुलीसाठी वस्तीगृह,वि.जा.भ.ज.साठी आश्रमशाळा,धनगर समाजासाठी आवास व तांडावस्ती सुधार योजना आदी योजनांची साविस्तर माहीती दिली.प्रमुख अतिथी श्री.शिवाजी चाटे संस्थापक अध्यक्ष यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॕड.श्री.उद्धवराव कराड यांनी सांगितले की,शासन विविध योजनासर्वसामान्य लोकांपर्यंतपोंहचण्यासाठी प्रचार आणि प्रसार करत आहे याचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे अवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर श्री.अजित चाटे,संचालक गजानन शिक्षण विद्या प्रसारक मंडळ तांबवा,नगरसेवक बाळासाहेब गाढवे श्री. रामधन अशोक चाटे उपसरपंच तांबवा,गणेश कांदे सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रसाद शुक्ला सर, गोविंद देशपांडे सर,श्री. शेख एन.एस.,श्री.सोन्नर आर.पी.,श्री हातागळे सर, वैशाली सांगळे हेउपस्थित होते.श्रीमती शेख मॅडम व त्यांच्या संस्कृतीक विभागाचा चमु यांनी शब्द सुमनांनी उपस्थित यांचे स्वागत केले.सुत्रसंचलन प्रा डॉ.कविता गित्ते-कराड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बारगजे व्ही.पी यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीयगीत वंदे मातरम यांनी झाली.या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने पालक,शिक्षक,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments