Type Here to Get Search Results !

केज परिसरातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण व्हावेत.-खासदार बजरंग बप्पा सोनवणे. केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उदघाट्न प्रसंगी प्रतिपादन

 केज परिसरातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण व्हावेत.-खासदार बजरंग बप्पा सोनवणे.

केज तालुकास्तरीय   कबड्डी स्पर्धा उदघाट्न प्रसंगी प्रतिपादन


.


केज/प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत बीड जिल्हा क्रीडा कार्यालय व गटसाधनकेंद्र केज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीविवेकानंद इंग्लिश स्कुल केज या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेस सुरुवात झाली.स्पर्धेचे प्रमुख उदघाटन मा.खासदार बजरंग बप्पा सोनवणे साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री श्री.अंकुशराव इंगळे हे होते तर प्रमुख उपस्थिती श्री.श्रीकांत महाजन पोलीस निरीक्षक केज हे होते.यांचे स्वागत प्राचार्य श्री.गणेश कोकीळ व क्रीडा संयोजक श्री.विनोद गुंड यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करताना खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ खेळून आपल्या केजचे नाव राष्ट्रीय पातळीवर  न्यावे अशी इच्छा यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्तकेली. तर,या स्पर्धेसाठी पंच म्हणून बर्डे सर,गिरी सर, कांबळे सर,पवार सर, तोंडसे सर,नागरगोजे सर, शुभम जाधव सर,कोरडे सर,शेवाळे सर यांनी काम पहिले.या स्पर्धेला क्रीडा शिक्षक पटाईत सर,टिके सर,जोगदंड सर,खडबडे सर,लोंढे मॅडम,गिरी मॅडम उपस्थित होते.या प्रसंगी क्रीडा संयोजक विनोद गुंड सर यांनी प्रास्ताविक केले तर गिरी सर यांनी सूत्रसंचलन केले.यास्पर्धेत केज तालुक्यातील तीस पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments