Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांची कर्तव्यावर निष्ठा हवी.-डॉ.हनुमंत सौदागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव येथे माहिती अधिकार दिन साजरा.

 विद्यार्थ्यांची कर्तव्यावर निष्ठा हवी.-डॉ.हनुमंत सौदागर   

जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा पिसेगाव येथे माहिती अधिकार दिन साजरा.



केज/प्रतिनिधी


विद्यार्थ्यांनी कर्तव्याचे पालन करायला हवे. कर्तव्यावर निष्ठा असायला हवी तरच भावी पिढीत आदर्श नागरिक घडतील असे मत डॉ.हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.

ते केज तालुक्यातील पिसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माहिती अधिकार दिना निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षशालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केज तालुका सर चिटणीस मुंजाबा करपे प्रमुख मार्गदर्शक डॉ. हनुमंत सौदागर, मुख्याध्यापक माधव गोरे 

आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या कृतीतून कर्तव्याचे पालन केल्यास प्रश्न निर्माण होत नाहीत.माहिती अधिकार काळाची गरज आहे परंतू माहितीच्या अधिकाराचा गैरवापर होऊनये.स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी कृतीत आणावी.सार्वजनिक मालमत्ता,पर्यावरणास  बाधा पोहोचणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त स्वागत गीताने करण्यात आली.प्रस्ताविक श्री.गोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह शिक्षिका मंगल चाटे, सुलोचना फड,सुनीता जाधव,मनीषा नांदे

,दिलीप मुंडे ,स्वाती शेप, सुचिता माने,शिवाजी टिके

आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments