Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत "शिक्षक दिन" साजरा.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत "शिक्षक दिन" साजरा.                                



केज /प्रतिनिधी 


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज शाळेत दि.५ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन, क्रांतिवीर म.जोतिबा फुले व क्रांतीज्योतीसावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस शिक्षक दिनानिमित्ताने या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम व बाळासाहेब भिल्लु राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन करुन अभिवादन केले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील तिरुत्तनी या छोट्या गावात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला.ते भारत देशाचे उपराष्ट्रपती होते व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.त्यांचा जन्मदिवस भारत देशात "शिक्षकदिन "साजरा केला जातो.क्रांतीवीर म.जोतिबा फुले अनेकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या भारतीय आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांनीही मुलींना शिक्षण देण्यासाठी अनेकत्रासाला सामोरे जाऊन प्रयत्न केले.अशा महान व्यक्ती मुळे गोरगरीबमुला-मुलींना शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.केज रोटरी तर्फे "नेशन बिल्डरअवार्ड" म्हणजे "राष्ट्र उभारणी शिल्पकार" २०२४ साठी या शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास संपत्ती सुदाम सरवदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष सौ.सिमा सुधीर मोहिते, सदस्य,प्रा.प.बापुसाहेब देविदासराव गायकवाड सर,श्री.भारत बाबुराव हांगे सर,बाळासाहेब भिल्लु राठोड सर, बाबासाहेब राजाराम मैंद सर,श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भारत भुमकर मॅडम,प्रशिक्षणा र्थी युवती सौ.सिमा सुधीर मोहिते मॅडम,शापोआ कामगार गणेश काशिनाथ माने,शिक्षणप्रेमी राधा आक्का खामकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भारत बाबुराव हांगे सर यांनी केले व बाळासाहेब भिल्लु राठोड सर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments