Type Here to Get Search Results !

जिवाचीवाडी येथील एडकावस्ती परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान. पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी.

 जिवाचीवाडी येथील एडकावस्ती परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान.

पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी.



केज/प्रतिनिधी


जिवाचीवाडी येथील एडकावस्ती परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात मागील तीन दिवसापासुन पावसाचा जोर वाढल्याने शेतीची स्थिती खूपच बिकट झालीआहे.त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेआहेत.

या पावसामध्ये कापूस, सोयाबीन,तुर,मुग,उडीद बाजरीसह इतर पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे

ज्यामुळे पिकांची नासाडी  मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.शेतकऱ्यांचे कष्ट आणि आर्थिक नुकसानी ची तीव्रता विचारात घेता ही परिस्थिती खूपच गंभीर आहे.प्रशासनाने तात्काळ केजतालुक्यातील जिवाची वाडी येथील शेतकऱ्यांच्या  पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्या कडुन केली जात आहे.  शेतकरी पंचनाम्याच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा करत आहेत.

पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी या उद्देशा ने त्यांनी ही मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments