Type Here to Get Search Results !

टाकळी गावचे भूमिपुत्र रोहिदास निवृत्ती मस्के केज विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक केज शासकीय विश्रामगृह येथे मित्र परिवार व कार्यकर्त्यांशी साधला संवाद.

 टाकळी गावचे भूमिपुत्र रोहिदास निवृत्ती मस्के केज विधानसभेची  निवडणूक लढविण्यासाठी  इच्छुक

केज शासकीय  विश्रामगृह येथे मित्र परिवार व कार्यकर्त्यांशी साधला संवाद.



केज/प्रतिनिधी


टाकळी गावचे भूमिपुत्र रोहिदास निवृत्ती मस्के हे केज विधानसभेची  निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.रोहिदास मस्के यांनी नुकतीच केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथेमित्रपरिवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधून बैठक घेतली आहे.

रोहिदास निवृत्तीराव मस्के रा टाकळी ता.केज जि. बीड येथील भूमिपुत्र असून त्यांच्या कामाचा अनुभव अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे व औरंगाबाद चार वर्षे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नऊ वर्षे,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आठरा वर्षे, महाराष्ट्रात कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी संचालक (संचालन) या पदावर नासिक,छञपती   संभाजीनगर,पुणे,कराड, नागपूर,अमरावती व शेवटी मुंबईहून कार्यकारी संचालक (संचालन) या पदावून सेवानिवृत्त झाले आहेत.तसेच वीज क्षेत्रातील नियोजन,प्रकल्प व संचालनाचा २७ वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे.त्यांचे सामाजिक कार्य कॉलेज पासूनच विद्यार्थी संघटनेत सक्रिय सहभाग महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कार्यरत मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत विविध पदावर कामकरून संघटनेच्या सभासदांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे.रोहिदास मस्के यांना कॉलेजजीवनापासून सामाजिक चळवळीची आवड निर्माण असल्या मुळे व मित्र परिवाराच्या आग्रहास्तव केज मतदार संघातील प्रलंबित प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी केज विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी रोहिदास मस्के व त्यांचे मित्रपरिवार समर्थक तयारीला लागले आहेत. 

त्यांचा विविध पक्षांची संबंध असल्यामुळे त्यांना एका मोठ्या पक्षाची उमेदवारी देखीलमिळणार आहे थोड्याच दिवसांमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची खात्रीलायक सूत्राकडून माहिती मिळाली आहे.रोहिदास मस्के हे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? व त्यांची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून निश्चित होते ?हे येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Post a Comment

0 Comments