Type Here to Get Search Results !

मांजरा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण खा. बजरंग बप्पा सोनवणे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मा.आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते झाले जलपूजन

 मांजरा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण खा. बजरंग बप्पा सोनवणे


खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मा.आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते झाले जलपूजन 




केज/प्रतिनिधी


यावर्षी बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते मांजरा धरणाच्या जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धरणाचा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आशेचा किरण आहे. जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले.

केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेला मांजरा धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यानिमित्ताने दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी खा.बजरंग बप्पा सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,आपली शेती समृद्ध करण्यासाठी, जलसंपत्तीचे महत्त्व आणि तिचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. हा प्रकल्प झाल्यापासून शेतीक्षेत्र ओलीताखाली आले आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. परंतू यावर्षी मुबलक पाऊस पडला आहे.त्यामुळे सर्वत्र ठिकाणचे जलस्रोत भरले आहेत.यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे असेही म्हणाले की,मांजरा धरणातील साचलेल्या पाणी साठ्याची जलपूजन आपल्या हस्ते होत आहे. त्याचा आपल्याला आनंद असून येणाऱ्या काळात आपण सर्वजन मिळून विकासाच्या कामांची पायाभरणी करणार आहोत.  कारण जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास साधला जाईल. असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी जलपूजन करतावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी खा.बजरंग बप्पा सोनवणे, मा. आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर भैय्या देशमुख, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव,  रमेशतात्या गालफाडे, शितलताई लांडगे, माजी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी, मुकुंद कणसे, कपिल मस्के, सय्यद शरिफ, केज न.प. गटनेते भाऊसाहेब गुंड, सर्व नगरसेवक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सभासद आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments