Type Here to Get Search Results !

जालना-बीड रोडवर कंटेनर-बसचा भीषण अपघात सदर अपघातात ६ जणांचा मृत्यू तर १८ जखमी ६ जणांची प्रकृती गंभीर

 जालना-बीड रोडवर कंटेनर-बसचा भीषण अपघात


सदर अपघातात ६ जणांचा मृत्यू तर १८ जखमी ६ जणांची प्रकृती गंभीर



जालना/प्रतिनिधी 


जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड नजीक बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  सदरअपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू  झाला असून १८ जण जखमी झालेत जखमी पैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सदरील बस हीअंबाजोगाई महामंडळ आगराची आहे सदर बस ही जालन्याला जात असताना अंबडपासून १० किमी अंतरावर झालेल्या या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जालना-बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले.घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदरील अपघात  नेमका कसा झाला आहे त्याची माहिती अजून ही पुढे आली नाही.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बस ला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक बसली , प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. 

याबसमध्ये एकूण २४ प्रवासी प्रवास करत होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments