Type Here to Get Search Results !

प्रयत्नाचा डोंगर चढुनी गाठले यशाचे शिखर, निश्चयाचे बळ मिळते फळ श्री.शैलेश मुंडे याची धाराशिव जिल्हा परिषद मध्ये सिनीयर अकाउटंट पदावर नियुक्ती.

 प्रयत्नाचा डोंगर चढुनी गाठले यशाचे शिखर,

निश्चयाचे बळ मिळते फळ 

श्री.शैलेश मुंडे याची धाराशिव जिल्हा परिषद मध्ये सिनीयर अकाउटंट पदावर नियुक्ती.



केज/प्रतिनिधी 


प्रयत्नाचा डोंगर चढुन यशाचे शिखर गाठणारा श्री.शैलेश मुंडे याची धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात सिनीयर अकाउटंट पदावर नियुक्ती  करण्यात आली आहे.या बाबत सविस्तर माहीती अशी की,नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत केज शहरातील  वसंत प्राथमिक शाळा केज शाळेचा विद्यार्थी श्री. शैलेश नागनाथ मुंडे समर्थ नगर केज येथीलरहिवासी हा धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये सीनियर अकाउटंट म्हणून नोकरी मिळाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.विशेष बाब म्हणजे त्याची लहानपणा पासून अतिशय चिकाटी व अभ्यासु वृत्ती होती. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले होते घरातील सर्व जबाबदारी आईवर येऊन ठेपलेली होती तरी पण आईने न डगमगता आपल्या मुलांवर चांगले सुसंस्कार व शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि मुलांचे मुलींचे चांगल्या प्रकारे शिक्षण त्यांना दिले गेले या मुलाने आपल्या आईला साथ देत घरातील जबाबदाऱ्या सांभाळात आपला अभ्यास चालू ठेवला व पहिली परीक्षा पास होऊन त्याला नौकरी मिळाली परंतु या नौकरीत सुद्धा समाधान न मानता पुढचे शिक्षण चालू ठेवले मला काहीतरी मोठी नौकरी मिळाली पाहिजे या निश्चयाने अभ्यासकरत राहिला इतकी मोठी कुटुंबाची जबाबदारी असताना सुद्धा आईनेही त्याला साथ दिली खरंतर त्या आईचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले पाहिजे.  अखेरीस त्याला मोठी नौकरी मिळालीचम्हणूनच म्हणतात प्रयत्नांचा डोंगर चढुनी गाठले यशाचे शिखर,निश्चयाचे बळ मिळते फळ त्याच्या या यशाबद्दल वसंत प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री.आस्वले सर व शिक्षक  वृंदानी अभिनंदन करुन त्यचा सत्कार केला आहे.शैलेश मुंडे यांनी शिक्षकांचे आभार मानुन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments