Type Here to Get Search Results !

केज शहरातील वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने पैठणीचा वितरण सोहळा संपन्न.

 केज शहरातील वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने पैठणीचा वितरण सोहळा संपन्न.



केज/प्रतिनिधी 


दिनांक ९ सप्टेंबर२०२४ रोजी घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा उत्सव आनंदाचा या कार्यक्रमा मध्ये ४० महिलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी रेश्मा गायकवाड या विजेत्या झाल्या होत्या त्याचबरोबर दिनांक ८ सप्टेंबर रोजी लहान मुलांसाठी घेण्यात आलेले रनिंग,लिंबू चमचा,संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले होते या सर्व खेळाचा बक्षीस वितरण सोहळा हा दिनांक १६  सप्टेंबर रोजी वक्रतुंड गणेश मंडळ या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या रेश्माताई गायकवाड यांना केज शिवसेना( शिंदे )गटाच्या शहराध्यक्षा वैशालीताई सांगळे यांच्या हस्ते ही पैठणी देण्यात आली व त्याचबरोबर सन्मानपत्र देखील देण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनाही सन्मानपत्र देऊनसन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते या सर्व विजेत्यांना वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व सदस्य प्रा.संजय कोरडे,सोनु अंधारे,सागर चाळक,आकाश चाळक, पिंटू अंधारे,अमोल अंधारे, शुभम अंधारे,पवन अंधारे, मयूर अंधारे,राजपाल राऊत व इतर सर्व सभासदांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments