Type Here to Get Search Results !

कै.कुंडलिकराव देवराव घुले यांच्या पुण्यस्मरणा निमित्त टाकळी येथे भागवत कथेचे आयोजन भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा श्री.नारायण बप्पा घुले यांचे आवाहन

 कै.कुंडलिकराव देवराव घुले यांच्या पुण्यस्मरणा निमित्त टाकळी येथे भागवत कथेचे आयोजन

भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा श्री.नारायण बप्पा घुले यांचे आवाहन 



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातीलटाकळी येथे कै.कुंडलिकराव देवराव घुले यांच्या पुण्यस्मरणा निमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील श्रोते व नागरिकांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायण बप्पा घुले यांनी केले आहे. भागवत कथा प्रवक्ते श्री ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळीकर हे सेवा देणार आहेत.दिनांक ३ सप्टेंबर मंगळवार रोजी पासून भागवत कथेला प्रारंभ होणार आहे.या कार्यक्रमाचे स्थळ प्राथमिक आश्रम शाळा टाकळी येथे असुन कथेची वेळ दुपारी ३ ते ५ आहे. दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १ वाजता ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांचे काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रमहोईल. व दुपारी १ ते ५ या वेळेत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. नारायण बप्पा घुले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments