Type Here to Get Search Results !

गोदावरी नदीला महापुर आल्या मुळे माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिरले पाणी गव्हाणथडी येथील रस्त्याच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संपर्क तुटला यास गुत्तेदार व गावचे सरपंच जिम्मेदार

 गोदावरी नदीला महापुर आल्या मुळे माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिरले पाणी

गव्हाणथडी येथील रस्त्याच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संपर्क तुटला यास गुत्तेदार व गावचे सरपंच जिम्मेदार 




माजलगाव/प्रतिनिधी


दोन दिवसांपासून  सतत पाऊस सुरू असून अतिवृष्टी मुळे माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीला महापुर आल्यामुळे शेतातील उभ्या पिकात पाणी शिरले आहे. 

तसेच गावातील रहदारी असलेल्या रोडवरील पुलाचे काम निकृष्ट झाल्या मुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन दिवस गावचा संपर्क तुटला आहे. सदरील गुत्तेदाराने काम करतेवेळी उंची वाढवणे गरजेचे होते परंतु ते खड्यात नळ्या टाकुन केल्या मुळे पुलावरून पाणी वाहत आहे. तरी यास गुत्तेदार व प्रशासकीय अधिकारी तसेच आमच्या गावाचा सरपंच जिम्मेदार आहेत. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

तसेच शेतात पाणी शिरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी  अशी मागणी शेतकर्यातुन जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments