Type Here to Get Search Results !

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजीत स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,माणसाचा दुसरा जन्म म्हणजे व्यक्तिमत्व होय- डॉ.सतीश साळुंके. बापाच्या हातातलं कोयतं मुलाच्या हातात जाऊ नये- युवराज हिरवे.


 जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजीत स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,माणसाचा दुसरा जन्म म्हणजे व्यक्तिमत्व होय- डॉ.सतीश साळुंके.

बापाच्या हातातलं कोयतं मुलाच्या हातात जाऊ नये- युवराज हिरवे.


केज/प्रतिनिधी  


जीवन विकास शिक्षण मंडळ आयोजित प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशिल कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात दि.१४ सप्टेंबर वार शनिवार रोजी हापुरस्कार वितरणसोहळा अत्यंत हर्षोत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. गिन्यानदेव गदळे सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ केज तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील डॉ.सतीश साळुंके लेखक, नाट्य कलावंत तथा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये श्री.अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ केज तथा सभापती,कृषि उत्पन्न बाजार समितीकेज हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेतील सह शिक्षक श्री.प्रबोधकांत समुद्रे तसेच इयत्ता सहावी तील विद्यार्थीनी यांच्या 'परंपरागत वंदनीय अभ्यागतम स्वागतम' या स्वागत गीताने झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शाळे तील सहशिक्षक अजय देशपांडे यांनी दिला.

कार्यक्रमाच्या पुढील सञात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कारमुर्तींचा सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये डॉ.सतीश साळुंके लेखक,नाट्य कलावंत तथा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,बीड,श्री. कोकणे राजकुमार तुकाराम जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा रामेश्वर वाडी,ता.केज,श्री.तौर गणेश धोंडीराम जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा घाटेवाडी,ता.केज,श्री. हिरवे युवराज अभिमन्यू जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा मानेवाडी,ता.केज, श्री.इंगळे राजाभाऊ रामधन जिल्हा परिषद  उच्च प्राथमिक शाळा उमरी,ता.केज,श्री.ठोंबरे राजेंद्र जालिंदर जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा  माळेगांव,ता.केज,श्रीमती बावचीकर लता शिवाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव-१,ता. केज,प्रा.कराड अविनाश महादेवराव स्व.प्रमोद महाजन कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय केज, श्री.तट राजाभाऊ हरिभाऊ,स्वामीविवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय केज,प्रा.गुंड विनोद चंद्रकांत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, केज.श्री.चाटे अंकुश अभिमान एम.टी.एस. पोस्टऑफीस,केज (शिक्षक)याप्रसंगी समूह गीतातील तबला वादक सिद्धांत खोगरे तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी प्रांजल जावळे, श्रेया सपाटे,संस्कृती गायकवाड,किशोरी मुळे, सिद्धी क्षीरसागर,गौरी देशमुख,श्रावणी सपाटे, आरती राऊत,सानिका गलांडे तसेच गुरुलिंग हालगे इत्यादींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग तांदळे, संचालक नारायण अण्णा अंधारे,श्री.दिनकरराव नाळवंडीकर,सौ.सुधा सतीश साळुंके,श्रीमती. शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापनसमिती स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज,सेवानिवृत्त मु. अ.श्री.बाळासाहेब तिडके, सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवनंदा मुळे,वसंत शितोळे मु.अ.प्राथमिक  विद्यालय,प्राचार्य गणेश कोकिळ,स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज,प्राचार्य शंकर भैरट,स्व.प्रमोद महाजन कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय केज आदी उपस्थित होते. सत्कार वितरण सोहळ्या नंतर प्रातिनिधिक स्वरूपा त सत्कारमूर्ती श्री.युवराज हिरवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मियता तसेचआपल्या शिक्षण क्षेञातील एकुण जडणघडणीचा प्रवास या प्रसंगी व्यक्त करताना म्हणाले की,शैक्षणिक माध्यमातून पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो,कारण शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना ध्येयवेडे व्हावे लागते,ऊसतोड भागातील विद्यार्थ्यांना घडवत असताना अनेक आव्हाने उभी राहतात त्यापैकी बालविवाह रोखण्यासाठी मी केंद्रातही अनेक वर्षां पासून कार्य करत आहे, तेंव्हा ज्ञानदानाचे कार्य करत असताना अपेक्षा एवढीच आहे,की बापाच्या हातातलं कोयतं मुलाच्या हातात जाऊ नये.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.सतीश साळुंके यांनी शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचे वास्तव आपल्या उपरोधिक विनोदीशैलीतून  विद्यार्थ्यापुढे मांडले,ते म्हणाले की,शिक्षण हे चार भिंतीच्या आत बंदिस्त स्वरूपात नसावे,विद्यार्थी केवळ गुणपञकावरील मार्कांनीच घडतो असे नाही,तर त्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचेआहे. आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या आधारे समाजातील दुःख नष्ट करुन समाज,देश कसा समृद्ध होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हे ज्ञानी लोकांचे काम आहे.व्यक्ती जरी गेला तरी व्यक्तिमत्व शिल्लक राहिले पाहिजे थोर महापुरुष हे समाजा साठी जगले.तेंव्हा त्यांचे विचार आचार आपण अंगीकारले पाहिजेत. परंतु आज समाजामध्ये ज्या विघातक घटना घडत आहेत तेंव्हात्यांनीदिलेल्या मूलमंत्रांचा का विसरपडत आहे.केवळ राष्ट्रगीत प्रतिज्ञा रोज म्हटलं म्हणजे आपण संस्कारक्षम बनत नाहीत,त्यासाठी संवेदन शीलता असावी लागते आपण समाजाचेकाहीतरी देणे आहोत,ही भावना  प्रत्येकाच्या मनामध्ये असावी लागते.माणसाचे भविष्य हातातल्या रेषेत नसून ते मनगटात असते. आणि ते व्यक्तिमत्वातून सिद्ध होते.तेंव्हामाणसाचा दुसरा जन्म म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय.याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे म्हणाले की,आजच्या सर्व आदर्श शिक्षकांनी पुढील आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अजूनही अथक परिश्रम घेऊनकार्य केले पाहिजे.अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव श्री.गिन्यानदेव गदळे म्हणाले की,स्व.नाळवंडी कर गुरुजी हे विद्यार्थ्यां साठी संस्कार केंद्र असायचे.आज ध्येयवेडी माणसं खूप कमी आहेत तेंव्हा आदर्श शिक्षक निवडणे म्हणजे खरंच कसोटी असते,खुपजण बोलणारे असतात परंतु बोलणार्या पेक्षा चांगलं वागणाऱ्या व्यक्तींची आम्ही निवड करतो.

कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री.संदीप शेंडगे यांनीकेले तर आभार शाळेच्यामु.अ. सौ.शिवनंदा मुळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments