Type Here to Get Search Results !

केज विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी श्रीक्षेत्र नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्यात सरकार येणार- हारुणभाई इनामदार दलित समाज बांधव देखील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार- नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोडे

 केज विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी श्रीक्षेत्र नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्यात सरकार येणार- हारुणभाई इनामदार 


दलित समाज बांधव देखील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार- नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोडे





बीड/प्रतिनिधी


 केज विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यातील नागरिकांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे  सरकार येणार असल्याचे बीड येथील पत्रकार परिषदेत बोलताना हारुणभाई इनामदार यांनी व्यक्त केले आहे. 

 केज विधानसभा मतदार संघातील दलित समाज बांधव देखील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नारायणगड येथे यावर्षी  दसरा मेळावा सपन्न होणार आहे. या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील दलित, मुस्लिम,मराठा यांच्यासह आठरा पगड जाती धर्मातील लोकांना आपण या मेळाव्यास सोबत घेऊन जाणार आहोत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी बोलताना हारुणभाई  म्हणाले की, मी उद्या पासून केज विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात संवाद दौरा सुरू करत आहे. संवाद दौरा हा संपूर्ण जिल्हाभर करणार आहे. दलित, मुस्लिम व मराठा समाजासह आठरा पगड जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन दसरा मेळाव्याला आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत. केज मतदारसंघातुन शंभर गाड्या घेऊन जाण्याचे नियोजन केले असल्याचे हारुणभाई इनामदार यांनी सांगितले. यावेळी या पत्रकार परिषदेला केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड,गटनेते राजूभाई इनामदार, डॉ.त्र्यंबक चाटे, दत्तात्रय हांडीबाग, लखन हजारे, विवेक  बनसोड, पाशाभाई शेख, डॉ.नौशाद शेख यांच्यासह  जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments