Type Here to Get Search Results !

कलावंतांच्या न्याय हक्का साठी केज तहसीलवर कलावंतांचाजागर लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडके कलावंत योजना सुरू करा.-अनिल वैरागे

 कलावंतांच्या न्याय हक्का साठी केज तहसीलवर कलावंतांचाजागर

लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडके कलावंत योजना सुरू करा.-अनिल वैरागे 



केज/प्रतिनिधी 


कलावंतांच्या विविध मागण्यासाठी दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलकार्यालया पर्यंत शेकडो कलावंतांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने वाजत गाजत जागर करतनिवेदन देण्यात आले.या निवेदना मध्ये कलावंतांच्या विविध मागण्या जसे की, लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडके कलावंत योजना सुरू करणे,बस प्रवास मोफत करणे,कलावंतांना स्वतंत्र घरकुल योजना लागू करणे,कलावंतांना विमा सुरक्षा लागू करणे आणि कलावंतांना मानधन सुरू करण्यापूर्वी त्या कलाकाराचे वय व कलाकांराची परीक्षा घेऊनच मानधन सुरू करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा उल्लेख होता महाराष्ट्र ही कलावंतांची आणि संतांची भूमी आहे. आपल्या लोककलेच्या माध्यमातून मनोरंजना बरोबरच लोककलेचा वारसा पुढे चालवणारे तमाम महाराष्ट्रातील कलावंत हे सरकारी योजनेपासून वंचित आहेत म्हणून पुरोगामी पत्रकार संघ जिल्हाप्रमुख दत्तात्रय मजमुले यांच्या मार्गदर्शना खाली कला क्रीडा विश्व समितीचे तालुकाध्यक्ष अनिल वैरागे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कलावंतांच्या उपस्थिती मध्ये तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन केज तालुका कला क्रीडा विश्व समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचेजिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय मुजमुले कला क्रीडा विश्व समितीचे तालुकाध्यक्ष अनिल वैरागे पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रणजीत घाडगे,सचिन लांडगे,मुनीर कुरेशी,शेख इक्बाल, किशोर भांडे,सिंधुताईमुळे अनिताताई कसबे यांच्या सह इतर पदाधिकारी व शेकडो कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments