Type Here to Get Search Results !

स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सांस्कृतिक सभागृहाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने दिल्या शुभेच्छा

 स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सांस्कृतिक सभागृहाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने दिल्या शुभेच्छा




केज / प्रतिनिधी



केज शहरातील अनेक वर्षापासून रखडलेले आमच्या स्वप्नातलं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहाचे काम  गेल्या दोन महिन्यापासून काम सुरू झाले असून या कामाच्या पायाभरणीचे भूमिपूजन आमदार नमिताताई मुदडा यांच्या हस्ते होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी केज नगरपंचायत च्या वतीने व नगराध्यक्षा यांच्या वतीने जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार यांनी संगीताताई ठोंबरे तसेच या कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत व दोन्ही  आजी माजी आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुढे बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की,या वास्तूचे भुमीपुजन पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात यावे अशी आमची इच्छा होती परंतु सत्तेपुढे शाहणपन चालत नाही.

यावर आमच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हारूनभाई इनामदार  म्हणले की, या कार्यक्रमाचे प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण द्यायला पाहिजे परंतु अद्याप आम्हाला निमंत्रण मिळालेले नसल्याने आम्ही उद्याच्या कार्यक्रमासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आमच्या स्वप्नातले सांस्कृतिक सभागृह होत असल्याने आमदार नमिता ताई यांना शुभेच्छा आहेत.

Post a Comment

0 Comments