Type Here to Get Search Results !

धावपटु भाग्यश्री जाधवर जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत प्रथम,आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया ला बहुमान.

 धावपटु भाग्यश्री जाधवर जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत प्रथम,आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया ला बहुमान.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी वाणिज्य शाखे तील विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री बालासाहेब जाधवर जिल्हास्तरीय ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आलेली आहे.दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थिनी भाग्यश्री बालासाहेब जाधवर हिने १९ वर्ष वयोगटातून तीन हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल कुमारी भाग्यश्री बालासाहेब जाधवर आणि तिचे मार्गदर्शक वैभव खाडे सर, सेवा निवृत्त क्रीडाशिक्षक गणपत पांचाळ यांचे संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे,संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे, कोषाध्यक्ष मुरलीधर काकडे आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण,सुनील साळुंके, विष्णू कावळे,शिवाजी मांदळे,संतोष रोकडे, शंकर पवार,उमाकांत मुंडे,  निखिल भिसे,दिलीप पारेकर,सुनिलदेवगावकर रामदास अंबाड,तुकाराम कापसे,सुरज लोखंडे, जगन्नाथ काळे,प्रमोद मोरे, रमेशकदम,साळुंकेमॅडम,अंबड मॅडम,नरके मॅडम, खेरूडकर मॅडम,यादव मॅडम,पाखरे मॅडम,सरवदे मॅडम,राठोड मॅडम,मोरे मॅडम,काळे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments