Type Here to Get Search Results !

केज विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांना देण्यात यावी-कार्यकर्त्यांची मागणी

 केज विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांना देण्यात यावी-कार्यकर्त्यांची मागणी



केज/प्रतिनिधी


केज विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांना देण्यात यावी अशी मागणी ओबीसी,एस.सी.कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. 

गेले ४५ वर्षापासून केज मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव सुटलेला आहे. 

परंतु अद्यापही दलित समाजाचा एकही उमेदवार या मतदार संघात निवडून आला नाही अथवा कुठल्याही पक्षांनी दलित समाजाचा उमेदवार दिला नाही. 

वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष  बाबासाहेब विठ्ठल मस्के हे दलित समाजाचे आहेत व ते वंचित बहुजन आघाडी कडून केज विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत म्हणून केज,आंबेजोगाई नेकनूर सह  ग्रामीण भागातील ओबीसी एस सी च्या कार्यकर्त्याकडून बाबासाहेब विठ्ठल मस्के यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी द्यावी अशी मागणी केले जात आहे लवकरच एक शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून बाबासाहेब विठ्ठल मस्के यांच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

बाबासाहेब मस्के हे भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीचे तीन वेळा केज तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहेत ते गेले ३० वर्षापासून ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठेने काम करत आहेत. 

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे आरक्षण बचाव यात्रा व मतदार संघातील लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने तत्पर राहून नागरिकांचे कामे करत आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाची आरक्षण बचाव यात्रा एस.सी,एस.टी,ओबीसी च्या हक्काची लढाई ही जनसामान्य पर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचण्याचा एक निष्ठेने काम केलेले आहे. 

केज तालुक्यातील गायरानधारकांना सातबारा मिळावा म्हणून अनेक वेळा मोर्चे बांधणी करून शासन स्तरावर गायरान धारकांचा आवाज उठवला, ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अनेक गावातील रस्त्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न, घरकुलाचे अनुदान व नवीन घरकुले मंजूर केले, पारधी समाजाचे विविध प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, गरीब मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलनात सहभाग नोंदवला, केज शहरा सह ग्रामीण भागातील नागरिकांचे तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन मधील विविध प्रश्न मांडून त्यांच्या पुढाकार घेतला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी अनेक ठिकाणी पाठपुरावा केले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे व बिलाच्या विरोधात किसान बाग आंदोलन एन.पी.आर.,एन.आर.सी.ची अंमलबजावणी  करण्यात येवू नये यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या घरावर मोर्चा काढला  यासह विद्यार्थी शेतकरी व नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर विविध आंदोलने करून आवाज उठवून प्रश्न मार्गी लावले आहेत. 

तसेच दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडण्यात व उद्ध्वस्त करण्यात आली त्या अनुषंगाने केज येथे रस्ता रोको आंदोलन, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी निलेश राणे यांनी फेसबुक वर अपशब्द वापरून पोस्ट केले त्या प्रकरणे गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाची केज न्यायालयात लढवली, पुणे मुंबई औरंगाबाद सह विविध ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमास व आंदोलनास उपस्थित राहुन पक्षश्रेष्ठींचा आदेश वेळोवेळी पाळून पक्ष्यांचे एकनिष्ठतेने काम करून पक्ष वाढवला आहे आजही राजगृहाची एकनिष्ठ असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब विठ्ठल मस्के यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी  कार्यकर्त्यातून केली जात आहे तसेच एक शिष्ट मंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी जाणार आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments