Type Here to Get Search Results !

बनसारोळा येथे साल गड्यास दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.

 बनसारोळा येथे साल गड्यास दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील  बनसारोळा येथीलज्ञानेश्वर सूर्यकांत सुवर्णकार वय ४०वर्षे हे शेतकरी रामेश्वर श्रीनिवास रांदड यांच्या शेतात सालगडी म्हणून मागील दहा वर्षापासून आहेत.त्यांनी १ ऑक्टोबर रोजी शेत मालकाच्या शेतातील ठिबकच्यानळ्या चेक करत असताना पाणी सोडले म्हणून दत्तात्रय बालासाहेब काकडे, श्रीकांत बालासाहेब काकडे या दोघा भावांनी येऊन 'तू रस्त्यावर पाणी का सोडले.? असे म्हणत बेदम मारहाण करीत सुवर्णकार यांना जखमी केले.भांडण सोडवण्यास आलेल्या त्यांची पत्नी सारिका सुवर्णकारयांनाही ढकलून दिले.याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपास पोलीस कॉ.तोंडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments