Type Here to Get Search Results !

उद्या मंगळवार पासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे बेमुदत कामबंद आंदोलन

 उद्या मंगळवार पासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे बेमुदत कामबंद आंदोलन



केज/प्रतिनिधी


ग्रामपंचायत मध्ये काम करणारा अत्यंत गरीब असणारा घटक म्हणजे ग्रामपंचायत चे शिपाई, पाणी पुरवठा, लिपीक हे कर्मचारी शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम हा कर्मचारी करतो, गावागावात पाणी सोडण्याचे काम हा कर्मचारी करतो,गावागावात जेवढ्या काही शासकीय मालमत्ता आहे. त्याची देखभाल हा कर्मचारी करतो,गावागावात जेवढे काही राष्ट्रीय सन राबविले जातात त्याचे नियोजन हा कर्मचारी करतो.एवढेच नाही तर कोरोना काळात या कर्मचाऱ्याचे खूप मोठे योगदान राहिले आहे परंतु यांचे कोठेच कौतुक करण्यात आले नाही.

    याच कर्मचाऱ्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पंचायत समिती स्थरावर मागील बऱ्याच वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. त्यात 2007 पासून थकीत राहणीमान भत्ता अद्याप कर्मचाऱ्याच्या तात्काळ वर्ग करण्यात यावा, थकीत भविष्य निर्वाह निधी रक्कम 8.33% प्रमाणे कर्मचाऱ्याच्या G.P.F.खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी,उत्पन्न आणि कर वसुलीच्या जाचक अटी मुळे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी प्रमाणात झाले आहे त्यांना ग्रामपंचायतकडून मागील सर्व उर्वरित वेतन रक्कम देण्यात यावी,कर आणि उत्पन्न वसुली ची जबाबदारी फक्त ग्रामपंचायत कर्मचारी नसून वसुलीसाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांची पण आहे याची ग्रामपंचायतेस जाणीव करून द्यावी,पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला रेनकोट, बॅटरी, हातामोजे, सर्क्रूड्रायव्हर, टेस्टर, पक्कड, गमबूट इत्यादी सर्व सेफ्टी किट वाटप करण्यात याव्यात, कर्मचारी हा लाईट खात्याचा कर्मचारी नाही म्हणून त्यास लाईट खात्याची कामे लावू नये, प्रत्येक कर्मचाऱ्यांना वर्षातून किमान दोन गणवेश देण्यात यावे,तसेच गाव स्थरावर काम करत असताना विनाकारण कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येतो तो थांबवावा याच कारणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ केज यांच्या कडून 8 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे तालुक्याचे अध्यक्ष कॉ. मस्सू शिवाजी कांबळे आणि सचिव कॉ.कल्याण माधवराव चाटे यांनी माहिती दिली

Post a Comment

0 Comments