Type Here to Get Search Results !

नाव्होली येथे आनंदाचा शिधा वाटप केल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त नाव्होली ग्रामपंचायतचा ग्रामस्थांना मुलभूत गरजा पुरवण्यावर भर

 नाव्होली येथे आनंदाचा शिधा वाटप केल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त


नाव्होली ग्रामपंचायतचा ग्रामस्थांना मुलभूत गरजा पुरवण्यावर भर



केज/प्रतिनिधी 


शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी नाव्होली ग्रामपंचायतने एक पाऊल पुढे टाकले असून गावच्या विकासासाठी गावचे सरपंच प्रतिनिधी मा.रंजित (बप्पा) बिक्कड, उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेताना दिसत आहेत. 

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील नाव्होली गावचे सरपंच मा. रंजित (बप्पा) बिक्कड यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामांवर भर दिला असुन शासनाच्या विविध योजना गावातील गोरगरीबा पर्यंत थेट पोहचवण्याचे काम ते करत आहेत.

त्यामध्ये जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेवुन अन्न, म्हणजे रेशन, सांडपाणी,पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, लाईट गावातील पथदिवे आणि रस्ते, बंदिस्त नाल्या तसेच दलित वस्ती सुधार योजना यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करून या सोबतच शासनाच्या गोरगरिबांसाठी असणाऱ्या योजनेमध्ये घरकुल, शेतकऱ्यांसाठी जलसिंचनासाठी विहीर, गायगोठा, शेततळे,कृषी विभागाच्या शेतीच्या निगडित अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्या गावात राबवुन जनतेचा विकास साधला जात आहे. तर गावाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण  त्यामध्ये अंगणवाडी पासून ते माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण यासाठी विशेष लक्ष दिले असून अंगणवाडीतील मुलांना सकस आहार, त्यांना अंगणवाडी गणवेश  तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आदर्श मुख्याध्यापक आणि तज्ञ शिक्षक वृंद यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस  मध्यान्ह भोजन व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना खेळांमध्ये प्रावीण्य मिळवुन दिल्याने शालेय विद्यार्थ्यांचे आणि अध्यापनाचे धडे देणारे शिक्षक यांना ग्रामपंचायतच्या वतीने गौरव करुन त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देत आहेत. 

त्याच बरोबर शासनाने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेवुन जीवनाशी निगडित शासनस्तरावरुन गावपातळीवर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा जनतेला दिला जात आहे. त्यामध्ये  दर महिन्याला मोफत रेशन यासह  वेळोवेळी येणारा आनंदाचा शिधा वाटप करुन या.रंजित (बप्पा) बिक्कड हे गोरगरीबांच्या आनंदात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजना आणली असुन यांचा लाभ गावातील गोरगरीब कुटुंबाला दिला गेला .त्याची अंमलबजावणीही नाव्होली ग्रामपंचायतने केली असून  गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा शासन स्तरावरून देण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्याला वाटप करण्यास विलंब झाला मात्र या आनंदाचा शिधाचा कोटा काल दि.५ ऑक्टोबर रोजी मशीनवर पडताच त्याचे वितरण तातडीने गावचे सरपंच प्रतिनिधी मा. रंजित (बप्पा) बिक्कड यांचे हस्ते काल सकाळपासून सुरु करण्यात आले आहे. यासाठी शासनाच्या नाममात्र शंभर रुपये एवढ्या माफक दरात चार वस्तू देण्यात आल्या यामध्ये १ किलो चणाडाळ, १ किलो गोडे तेल , १ किलो साखर आणि १ किलो रवा अशा चार वस्तु हा आनंदाचा शिधा  मा.रंजित बप्पा यांच्या हस्ते गावकऱ्यांना वाटप करण्यात आला.

त्यामुळे अशा महागाईच्या काळात अशा योजनेचा लाभ दिल्यामुळे गावकऱ्यांनी शासनाचे आणि गावचे सरपंच,  उपसरपंच, सर्व सदस्य कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. या वितरण कामी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचेसह विलास बिक्कड,व त्यांना सहकार्य करणारे उत्रेश्र्वर शिंदे, भागवत सावते पा.पु.कर्मचारी रमेश बिक्कड, सेवक ज्ञानेश्वर शिंदे हे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments